इतिकर्तव्यता

1
            हिंदू संस्कृती (धर्म नव्हे) अनुसार वंदनीय आणि अध्यात्मिक केंद्रबिंदू, आद्य ग्रंथ म्हणजे 'श्रीमद्भगवतगीता'.
मनुष्य जन्मामध्ये येऊन केवळ दोन पावलांवर चालणे, दोन कानांनी श्रवण करणे, दोन डोळ्यांनी सौंदर्यदर्शन करणे आणि चार खांद्यांवर निद्रावस्थेत स्वार होऊन जगाचा निरोप घेणे इतकेच ध्येय साकारणे म्हणजे 'मनुष्यत्व' नाही.
"चार डोक्यांमध्ये नाही तर चार मनांमध्ये जागा बनवून आपल्यात काहीतरी नवीन आहे, आपण काहीतरी एकमेव करु शकतो याची अनुभुती देणे म्हणजे खरे मनुष्यत्व!" हे स्पष्टरित्या गीतेत वर्तविलेले आहे स्वयं भगवंताच्या परम वाणीतून!

जन्माला येऊन चार 'सु'वाच्य शब्दांचा वाणीकाराकरिता उपयोग करणे(वाणी+आकार), आई-वडीलांची सेवा करणे, समाजाचा एक अमुल्य घटक म्हणून त्याच्या व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणणे, चार लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे, इत्यादी मनुष्याची 'आद्य'कर्तव्ये झाली.
पण 'इति'कर्तव्यतेचं काय?

"नाहं पशु, नाहं पक्षी, अहं मनुष्य:" या गीतेतील उक्तीला समजून घेतले तर इतिकर्तव्यता काय असते हे समजून येईल.

"मी पशु नाही, मी पक्षी सुद्धा नाही. मी मनुष्य आहे." ही समज येईल तेव्हा इतिकर्तव्यतेबद्दल भावमय विचार आत्मसात करण्यास मदत होईल.

पण प्रश्न पडतो कि 'इतिकर्तव्यता' म्हणजे नेमकं काय?

अगदी सोपं......."ध्येय!"

अहं......! पैसे कमवण्याकरिता निश्चित केलेले एक मृगजळासमान स्थानक नव्हे, तर अस्तित्व संपल्यानंतर सुद्धा सदैव कुणाच्या मनात एक कायम जागा निर्माण करणारा ठराविक कार्यक्रम!
प्रथमत: ध्येयाबद्दलची परिभाषा सुधारायला हवी. जेणेकरुन अंतर्ज्ञानात भर पडण्यास मदत होईल.
तद्नंतर.....मी मनुष्य आहे तर कसा?

म्हणजे नेमकं माझ्यात काही वेगळं आहे/नाही जे पशुंकडे आहे/नाही याची पडताळणी करायला हवी.
मी कसा जगत आहे आणि कसा जगायला हवं याबद्दल आत्मिक जाणीव करुन घ्यायला हवी.
महान ऋषि तसेच राजा भगवान मनुंनी वर्तवलिलेल्या "मनोर्पत्य इति मनुष्य:"(मनुचे अपत्य....अर्थात मनुचेच नाही तर मनुसारख्या तीक्ष्ण बुद्धीधारक ऋषिंचा पुत्र) त्याचबरोबर "सम्यक तोपि इति संतान:"(सम्यक वर्तणूक बाळगणाराच 'संतान' म्हणण्यास योग्य)

या उक्तींनुसार आज आपण आहोत/नाहीत हे लक्षात घ्यायला हवं.
इत्यादी गोष्टी जरी जाणून घेऊन त्यानुसार बनणे म्हणजेच 'इतिकर्तव्यता!'
अवघड काहीच नाही जर कर्म सम्यक आणि दृष्टीचे बांध सकारात्मकतेच्या सरितेवर असतील तर!
बाकी दुनिया आपलीच आहे....!
फक्त विचार पेटवून आणि जीव एकटवून घ्यायलाच उशीर!


✍🏻अविनाश काठवटे🙏🏻



Tags

Post a Comment

1Comments
Post a Comment