उद्योग हवा कि सहवास?

0

असं म्हणतात कि माणूस सर्वांत बुद्धिमान प्राणी असून सुद्धा अस्त-व्यस्त राहतो.

काही न काहीतरी हातात पाहिजेच तेव्हाच आत्म्याला शांती मिळते.

मी अनुभवल्यानुसार सांगतो कि कुणाच्या हातात कागद दिला तर त्यापासून काहीतरी वस्तू बनवल्या जाणार....कुणाच्या हातात काडी द्या! तिचा उपयोग हमखास दातांतील अडकलेले अन्न काढण्यासाठी होईल!

कुणाच्या हातात चेंडू द्या...त्याला फिरकी दिल्याशिवाय चैन पडत नाही. कुणाच्या हातात रबर द्या.....! 

मग तर विचारायचंच काम नाही कि त्या रबराचे ताणून-ताणून काय हाल होतील!

माणूस हा सर्वांत कमी आराम करणारा आणि जास्तीत जास्त स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करणारा प्राणी आहे.

मानसशास्त्रानुसार; माणसाचे रिकामे हात सुद्धा शांत बसू शकत नाहीत! कुणी नाकात तरी घालेल,कुणी कानात घालेल किंवा कुणी डोकं तरी खाजवत बसेल!

पण या कृतींद्वारे माणूस काहीतरी नवीन प्रयत्न करत असतो आणि नवीन शिकत सुद्धा असतो.मात्र तसे विचारता उत्तर मिळते ,"काय करु? काही उद्योगच नाही!"

अहं.....! हा उद्योगाचा प्रश्न नाही माऊली! प्रश्न आहे सहवासाचा! 

एकटा माणूस आणि चार माणसांत असलेला माणूस या दोघांकडे पाहता लक्षात येते कि चार चौघांत असलेला एकट्या गड्यापेक्षा थोडा हूशार आणि कल्पित आहे!

असे का बरे?

कारण चार-चौघांत बोलणार्याचे भाव,विचार,शैली,कौशल्य आदि गोष्टी सहज झळकतात शिवाय एकटा बसणार्यात त्या सर्व गोष्टी असून त्या प्रगट होऊ शकत नाही कारण तो चार-चौघांत न मिसळता आपल्याच विश्वामध्ये गूंग झालेला असतो.

म्हणून चौघांत वावरायला हवं.आपले गुण इतरांना कळतात आणि इतरांचे काही चांगले गुण प्रेरक ठरण्यास सोपे जाते!

म्हणजे उद्योग हवाच मात्र सहवासाची सुद्धा जोड हवी!😋


-अविनाश काठवटे



Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)